आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

जनतेच्या हितासाठी पत्रकारांची धडाडी चिंचोली फाट्यावर बदलाची नवी पहाट

अहिल्यानगर, राहुरी तालुका आज दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी समाजातील समस्या दिसल्या की त्या बदलून दाखवण्याची शक्ती जर कोणात असेल, तर ती कटिबद्ध मनात जिवाभावाने समाजासाठी काम करणाऱ्या हातात असते. चिंचोली फाटा बसथांब्यावर बस थांबत नसल्याची समस्या कित्येक दिवस जनतेला त्रस्त करत होती. पण “हे बदलू शकते, बदलायलाच हवे!” असा दृढनिश्चय करून या प्रश्नाचा धांडोळा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून हा मुद्दा पुढे नेण्यात आला. संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. संतोषजी निकम यांच्या मार्गदर्शनाने संघातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी हा संघर्ष जनतेचे हक्क मिळवून देणाऱ्या मोठ्या विजयात परिवर्तित झाला.महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब जगताप, कार्याध्यक्ष संजय वाल्हेकर, दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे, सहसंघटक पिनू भोसले, तालुका संघटक राजू भोसले, तालुका उपाध्यक्षा मंजुषा मिसाळ, सहसंघटक दिलशाद शेख, सदस्य वंदना मिसाळ, नगर जिल्हा सचिव कावेरी भिंगारदिवे या सर्वांनी दाखवलेली टीमस्पिरिट ही खरी प्रेरणादायी कहाणी ठरली.ही फक्त बसथांब्याची समस्या नव्हती, हा होता जनतेच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न.पत्रकारांनी हा प्रश्न केवळ मांडला नाही तर तो सोडवून दाखवला.आज चिंचोली फाटा बसथांब्यावर बस थांबण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कारण काही जिद्दी मनांनी ठरवले अडथळे कितीही असले तरी जनतेच्या हिताचा मार्ग रोखू शकत नाहीत!”ही कामगिरी प्रत्येक समाजकार्यकर्त्याला, प्रत्येक पत्रकाराला प्रत्येक तरुणाला एक संदेश देते उभे रहा… आवाज उठा… बदल घडवून दाखवा.कारण बदल तेथेच घडतो, जिथे कोणीतरी पहिला पाऊल उचलण्याची हिंमत दाखवतो.जर मनात लोकांसाठी प्रेम असेल, तर कोणतीही समस्या मोठी नसते आणि कोणताही बदल अशक्य नसतो. हेच राष्ट्रीय विश्वकर्मा पत्रकार संघाने दाखवून दिले

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.