आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

महाविकास आघाडीचा २४ ऑक्टोबरला नाशकात भव्य मोर्चा; तयारीसाठी नियोजन बैठक संपन्न बाळासाहेब थोरात, अदित्य ठाकरे, रोहित पवार यांचेसह माकप,भाकप व समविचारी पक्षाचे नेते सहभागी होणार 

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक दिं.१२ ऑक्टोबर, राज्यातील सद्यस्थिती, जनतेचे प्रलंबित प्रश्न आणि सरकारच्या धोरणांविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने येत्या २४ ऑक्टोबर रोजी महामोर्च्याच्या पूर्वतयारीसाठी आज काँग्रेस भवन, महात्मा गांधी रोड, नाशिक येथे प्रमुख नेत्यांची महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत मोर्च्याचे नियोजन, कार्यकर्त्यांची फळी आणि आंदोलनाची रणनीती यावर सविस्तर चर्चा करून रुपरेषा निश्चित करण्यात आली.

 

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितले की, “हा मोर्चा केवळ राजकीय नसून जनतेच्या हक्काची लढाई आहे. सरकारच्या दडपशाहीविरोधात आणि अन्यायाविरोधात जनता स्वयंस्फूर्तीने या मोर्च्यात सामील होईल. हा मोर्चा ऐतिहासिक ठरेल.”

या नियोजन बैठकीमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून, मोर्च्याच्या यशासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.

 

बैठकीला महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश सचिव प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश (बबलु) खैरे, काँग्रेस उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळ यांच्यासह माजी स्थायी समिती सभापती संजय चव्हाण (शिवसेना-उद्धव ठाकरे गट) राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष छबु नागरे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) काॅ. राजु देसले ( आयटक), ॲड.तानाजी जायभावे (सी.पी.एम.), काॅ.तल्हा शेख, काॅ. मनोहर पगारे, काॅ. प्राजक्ता कापडणे, काँग्रेसचे उध्दव पवार, पोपटराव धात्रक, जयेश पोकळे, विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस समाधान बागुल, संदिप वाघ राष्ट्रवादी काँग्रेसचे दर्शन लड्डा आदींसह पदाधिकारी बैठक वेळी उपस्थित होते.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.