आपला जिल्हाक्राईम स्टोरीताज्या घडामोडी

नाशिक शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न; नाशिकचा विकास फक्त काँग्रेस काळात, आज भाजपच्या राजवटीत मात्र शहर भकास ; शरद आहेर यांचा घणाघात” 

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक दिं ७ ऑक्टो, “नाशिक शहराचा खरा आणि शाश्वत विकास फक्त काँग्रेस आघाडीच्या काळातच झाला. आज भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे नाशिक शहर पूर्णपणे भकास झाले आहे,” असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर यांनी केला ते शहर काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत काँग्रेस भवन, महात्मा गांधी रोड, नाशिक येथे मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

 

ते पुढे म्हणाले की, नाशिकच्या भूतकाळातील आणि वर्तमान स्थितीची तुलना केली. “काँग्रेसच्या काळात नाशिकला उद्योगांची मोठी देणगी मिळाली. सातपूर आणि अंबड सारख्या औद्योगिक वसाहती (MIDC) काँग्रेसच्या काळातच बळकट झाल्या, ज्यामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळाला. सिंहस्थ कुंभमेळ्याचे चोख नियोजन करत शहरात उड्डाणपूल, रस्ते आणि पायाभूत सुविधांचे जाळे काँग्रेस सरकारनेच विणले,” असल्याचे त्यांनी नमुद केले.

 

यानंतर नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आणि नाशिक आढावा बैठकीचे अध्यक्ष निलेश (बबलु) खैरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात

पदाधिकाऱ्यांना आपल्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याच्या सुचना केल्या त्याच बरोबर ह्या आढावा बैठकीत शहर काँग्रेसच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभाग, आघाडी व सेल (महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, आणि एनएसयूआय) व विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या काळात केलेल्या आंदोलनांचा आणि जनसंपर्क मोहिमांची बाब स्पष्ट करत येत्या काळात यापेक्षा अधिक जोमाने काम करण्याची गरज असल्याचे नमूद केले.

 

जेष्ठ नेते राजेंद्र बागुल यांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला, मात्र शहरात जागोजागी खड्डे, वाहतूक कोंडी आणि कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. नवीन मोठे उद्योग शहरात आणण्यात भाजप सरकार अपयशी ठरले असून, जुने उद्योगही इतरत्र स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे आजचे नाशिक केवळ कागदावरच ‘स्मार्ट’ राहिले असून प्रत्यक्षात ते वेगळेच असल्याचे नमूद केले.”

 

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड, विजय राऊत, युवक काँग्रेस अध्यक्ष जयेश पोकळे, उल्हास सातभाई, सुभाष देवरे, सिराज कोकणी, महिला अध्यक्षा स्वाती जाधव, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष गौरव सोनार आदींनी मनोगत व्यक्त केले. ह्या बैठकीदरम्यान *नाशिक शहर अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, ओबीसी विभाग शहराध्यक्ष सुदेश मोरे, सोशल मिडीया विभाग अध्यक्ष हर्षल पवार यांच्या नवनियुक्ती बाबत शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.*

 

यावेळी बैठकीदरम्यान तीन ठराव करण्यात आले.

 

१) लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी दिल्ली येथे इंडिया आघाडीच्या खासदारासमवेत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार याच्या राजीनाम्याबाबत घेतलेल्या भूमिकेच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करण्यात आला.

 

२) शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्या-या राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर खासदारांना दिल्ली पोलिसांनी दिलेल्या वागणुकीचा आणि त्यांना ताब्यात घेण्याच्या सरकारी कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध करणारा ठराव ह्या बैठकीत करण्यात आला.

ह्या दोन्ही ठरावाचे वाचन शहराध्यक्ष निलेश (बबलु) खैरे यांनी करुन उपस्थित सर्वानी हात उंचावून ठराव होय म्हणून मंजूर केला.

 

३) दडपशाहीचा तीव्र निषेध : मुंबईत आदिवासी विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमाराचा आणि सरकारी दडपशाहीचा ही जिल्हा बैठक जाहीर आणि तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचा ठराव ह्याठिकाणी मांडण्यात आला ठरावाचे वाचन ज्ञानेश्वर काळे यांनी तर उपस्थित सर्वानी हात उंचावून ठराव होय म्हणून मंजूर केला.

 

यावेळी ब्लॉक अध्यक्ष भारत पाटील, जाकीर अत्तार, किरण जाधव, अभिजित राऊत आदींसह उध्दव पवार, बाळासाहेब गामणे, शंकर जाधव, मंगेश लहामगे, समाधान बागुल, मकरंद जाधव, संदिप वाघ, योगेश गांगुर्डे, अरुण दोंदे, कुसुमताई चव्हाण, ज्युली डिसुजा, डाॅ.सुचेता बच्छाव, वृंदा शेरे, गुड्डी आप्पा, रोज शर्मा, सोमनाथ मोहिते, अजिनाथ नागरगोजे, इसाक कुरेशी, आकाश घोलप, महेश अहिरे, कैलास महाले, धोंडीराम बोडके, बाबा खतीब, ॲड विकास पाथरे, ॲड सुमित चोपडे, ॲड किर्ती राठोड, जावेद शेख, मुश्ताक कुरेशी, संतोष कस्तुरे, राजेंद्र महाले, असिफ पठाण, पोपटराव नागपुरे, प्रकाश माळी, फारुख कुरेशी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थितीत होते.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.