क्राईम स्टोरीक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

गोवा येथील ॲथलेटिक्स मध्ये आर्या पगारे हिने जिंकले रोप्य पदक!

नाशिक प्रतिनिधी

नाशिक – गोव्यातील अटल स्टेडियमवर महाराष्ट्राच्या खेळाडू आर्या योगेश पगारेने २७ ते २९ सप्टेंबर २०२६, आयोजित गोव्यातील कुजिरा येथील अटल स्टेडियमवर झालेल्या ३७ व्या पश्चिम विभागीय जुनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. मुलीच्या १४, वर्षाखालील भालाफेक स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आर्याने रोप्य पदक जिंकून शाळा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याला गौरव मिळवून दिला!

विशेष म्हणजे आर्य पगारे ही आपल्या नाशिक मधील रमाबाई आंबेडकर नगर खडकाळी नाशिक येथील, रहिवासी असून आर्याचे वडील हे महाराष्ट्र पोलीस खात्यात अधिकारी म्हणून मुंबई पोलिसात कार्यरत आहे त्यांच्या मुलीने जे यश मिळवलेले आहे त्यामुळे नाशिक येथील रहिवासी यांना खूप आनंद झाला असून आपल्या भागातील आर्याने महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे अशी भावना, रमाबाई आंबेडकर नगर खडकाळी, येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
आर्या पगारे आपल्या यशामागे आई-वडील खंबीरपणे उभे राहिले आणि शिक्षकांनी जे मार्गदर्शन केले त्यामुळे मला यश मिळाले असे मनोगत व्यक्त केले

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.