राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त काँग्रेसकडून अभिवादन बापूंच्या विचारांना आचरणात आणण्याचा आणि देशाच्या विकासासाठी संकल्प करूया – डाॅ.शोभा बच्छाव
नाशिक : प्रतिनिधी

नाशिक दिं २ ऑक्टोबर, राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नाशिक शहर काँग्रेस कमिटीकडुन काँग्रेस भवन, महात्मा गांधी रोड, नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डाॅ.शोभाताई बच्छाव व नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष निलेश (बबलु) खैरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डाॅ.शोभा बच्छाव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चंपारण सत्याग्रह, असहकार चळवळ, दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलन यांसारख्या चळवळींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. बापूंनी केवळ देशाच्या स्वातंत्र्यासाठीच लढा दिला नाही, तर अस्पृश्यता निवारण, जातीभेद निर्मूलन आणि सामाजिक समतेसाठीही मोठे कार्य केले.
त्या पुढे म्हणाल्या की, भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी सन १९६४ मध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. तो भारतासाठी अत्यंत कठीण काळ होता. देशात अन्नाची टंचाई होती आणि पाकिस्तानचे आक्रमणही झाले होते. अशा संकटसमयी शास्त्रीजींनी देशाला खंबीर नेतृत्व दिले. त्यांनी देशाला “जय जवान, जय किसान” हा अजरामर नारा दिला. या एकाच घोषणेने देशाच्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवले आणि शेतकऱ्यांना अन्नोत्पादनासाठी प्रेरित केले. त्यांच्या याच खंबीर नेतृत्वामुळे भारताने १९६५ च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव केल्याचे नमूद करुन आजच्या या दिवशी आपण बापूंच्या विचारांना आचरणात आणण्याचा आणि देशाच्या विकासाचा संकल्प करूया असे प्रतिपादन खासदार डाॅ.शोभाताई बच्छाव यांनी केले.
तसेच नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश खैरे यांनी आपल्या भाषणात गांधी विचारच देशाला वाचवू शकतो. त्याचबरोबर प्रामाणिक नेतृत्वाची देशाला गरज असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर प्रा भालचंद्र पाटील, प्रा आदिनाथ नागरगोजे, राजेंद्र बागुल, बाळासाहेब गामणे, पोपटराव धात्रक, उल्हास सातभाई यानीही आपले मनोगत व्यक्त केले.
*काँग्रेस पदाधिकारी हे पंचवटी रामकुंड येथे गांधी जयंतीनिमित्त गांधी ज्योती येथे अभिवादन करण्यासाठी गेले असता तेथील अवस्था खुपच दयनीय असल्याचे बघत असताना त्याठिकाणी पुर्वचे आमदार राहुल ढिकले, जेष्ठ नगरसेवक गुरुमित बग्गा आणि कुंभमेळा कमिटी पाहणी करण्यासाठी आली होती. त्यांच्या ही बाब शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश खैरे यांनी निर्दैशनास आणून दिल्यानंतर तात्काळ काम करुन देण्याचे मान्य केले.*
यावेळी नाशिक शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, ओ.बी.सी. शहराध्यक्ष सुदेश मोरे, लक्ष्मण धोत्रे, पंचवटी ब्लाॅक अध्यक्ष अभिजित राऊत, डाॅ. सुचेता बच्छाव, वृंदा शेरे, मंगेश लहामगे, विलास निकुंभ, अनिल कोठुळे, संदिप वाघ, योगेश गांगुर्डे, दत्तात्रय सोनवणे, आकाश घोलप, अरुण दोंदे, हर्षल पवार, इसाक कुरेशी, श्रीकांत शेरे, सोमनाथ मोहिते, जावेद शेख, संतोष कस्तुरे, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रकाश माळी, शैलेश मैदं, गोरख साळवे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



