ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसचा एल्गार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून राजीनामा घ्या ; काँग्रेस मागणी
नाशिक : प्रतिनिधी

नाशिक दिं २८ सप्टेंबर, केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद आणि मतदार याद्यांच्या पुनरीक्षणातील कथित गंभीर चुकांवरून देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी घेतलेल्या एकतर्फी निर्णयांमुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करत त्यांच्यावर देशद्रोहासह विविध कलमांखाली फौजदारी गुन्हे दाखल करून स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश (बबलु) खैरे, नाशिक जिल्हा उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर यांच्या नेतृत्वाखालील व प्रदेश उपाध्यक्ष शरदराव आहेर व प्रदेश सचिव प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने महामहिम राष्ट्रपतीच्या नावे नाशिक अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्या मार्फत निवेदनाव्दारे केली
निवेदनात इंग्रजी वृत्तपत्राच्या शोधनिबंधात्मक अहवालात (Investigative Report) असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे की, निवडणूक आयोगाच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) प्रक्रियेदरम्यान इतर दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी तब्बल १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांनी इतर दोन आयुक्तांना विश्वासात न घेता, बहुमताचा अनादर करून अनेक एकतर्फी व बेकायदेशीर निर्णय घेतल्याचा आरोप आहे.
SIR या वादग्रस्त प्रक्रियेद्वारे देशातील सुमारे १३ कोटी कायदेशीर मतदारांची नावे मतदार यादीतून कथितपणे वगळण्यात आली आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाला थेट ‘वोट चोरी’ (मत चोरी) असे संबोधत ज्ञानेश कुमार यांच्यावर ‘देशद्रोहाचा’ गंभीर आरोप केला आहे. याला अनुसरूनच नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्ञानेश कुमार चोर है..चोर है., ज्ञानेश कुमार राजीनामा द्या… राजीनामा द्या., संविधानिक अधिकार डावलणा-या ज्ञानेश कुमार यांचा धिक्कार असो..धिक्कार असो., अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर निवेदन देण्यात आले.
निवेदनावर शहराध्यक्ष निलेश (बबलु) खैरे, जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, भारत टाकेकर, महिला अध्यक्षा स्वाती जाधव, नगरसेविका नाजिया अत्तार, कुसुम चव्हाण, रईस शेख, जाती विभागाचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, युवक काँग्रेस अध्यक्ष गौरव पानगव्हाणे, जयेश पोकळे, उध्दव पवार, अरुण दोंदे, संपत वक्ते, ओबीसी विभाग शहराध्यक्ष सुदेश मोरे, संदीप वाघ, विक्रांत वावरे, दत्तात्रय सोनवणे, मंगेश लहामगे, भारत पाटील, अभिजित राऊत, किरण जाधव, भारत पाटील, जाकीर अत्तार, रमेश जाधव, रामदास धांडे, समीर देशमुख, रामा चौरे, के.के गांगुर्डे, तुकाराम जाधव, गोरख सांगळे, गणेश कोठुळे, बाळासाहेब गामणे, नारायण पाटील, प्रभाकर धात्रक, सचिन होळकर, धर्मराज जोपळे, सोमनाथ मोहीते, शंकर जाधव, मकरंद जाधव, आकाश घोलप, गौरव सोनार, अजिनाथ नागरगोजे, रामकिसन चव्हाण, संतोष ठाकूर, हर्षल कापडणीस, हर्षल पवार, उमाकांत गवळी, फारुख कुरैशी, रोज शर्मा, आकाश गरड, देवेन मारु, वृंदा शेरे, गुड्डी आबा, गोरख साळवे आदींसह काँग्रेस पदाधिकारी यांच्या स्वाक्ष-या आहेत.



