आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक उत्सवात!पुढच्या वर्षी लवकर या लाडक्या बाप्पाला निरोप 

नाशिक प्रतिनिधी

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक उत्सवात!पुढच्या वर्षी लवकर या लाडक्या बाप्पाला निरोप

आज 25 सप्टेंबर, 2026 गणेशविसर्जनाचा नाशिक मध्ये उत्सव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला, हजारोंच्या संख्येने लोक हे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात,यंदा बारा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी नाशिक शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीला पारंपरिक वाकडी बारव येथून सकाळी साडेअकराच्या सुमारास उत्साहात सुरुवात झाली.

यावेळी मंत्री गिरीश महाजन , आमदार देवयानी फरांदे, महापौर हिमगौरी आडके, यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक आणि मनपा आयुक्त मनिषा खत्री ,यांची उपस्थिती होती. नाशिकच्या पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ वाकडी बारव येथून होण्याची परंपरा आहे.

वाकडी बारव परिसरात सकाळपासूनच गणेशभक्तांची गर्दी झाली होती.पारंपरिक ढोल ताशांचा गजरात गणरायाचा जयघोष आणि

उत्साहाच्या वातावरणात मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाच्या गणपतींच्या सहभागामुळे मिरवणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

नाशिकच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळे सहभागी होतात.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मिरवणुकीत एकूण 25 मंडळांनी सहभाग नोंदवला होता.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.