ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नाशिक येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट आणि पाठिंबा दिला!

नाशिक प्रतिनिधी मनिष तिवडे

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नाशिक येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट आणि पाठिंबा दिला!

 

गोल्फ क्लब मैदानावर गेल्या १२ दिवसांपासून विविध न्याय्य मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे सुरू असलेले उपोषण आता राज्य सरकारच्या अडचणी वाढविणारे ठरत आहे. आंदोलनस्थळी बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधत पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर गुरुवारी सकाळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. या पाठोपाठ गुरुवारी सायंकाळी युवा नेते अभिजित दिपके यांनी आंदोलनस्थळी जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांची जी मागणी आहे तीच आमची मागणी आहे व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून आंदोलनाल आता देशभरात आणि राज्यभरात राजकीय पाठिंबा मिळत असून, सरकारविरोधातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

 

आंदोलनस्थळी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती, आश्रमशाळांमधील दुरवस्था आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांची पाहणी केल्यानंतर दिपके यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास विभागावर सडकून टीका केली आणि आदिवासी विकास मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि सचिव यांना बंडतर्फ करण्याची मागणी केली आश्रमशाळांमधील उघडी शौचालये, अस्वच्छ पाणी, निकृष्ट अन्न आणि विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टांचे छायाचित्रे दाखवत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आंदोलनाचा वणवा महाराष्ट्रभर पेटवू

दरम्यान, उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची ढासळती प्रकृती पाहता दिपके यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. “तुमचा जीव या लढ्यापेक्षा मोठा आहे. संवेदनहीन सरकारला तुमच्या जीवाची किंमत नसेल; मात्र महाराष्ट्राला तुमचा आवाज हवा आहे. त्यामुळे उपोषण थांबवा आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना एकत्र करून या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटवू. गरज पडली तर मुंबईत धडक देऊ आणि राजभवनावरही आवाज बुलंद करू. या संघर्षात मी राजकीय नेता म्हणून नव्हे, तर विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,असा निर्धार दिपके यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी, आदित्य ठाकरे आणि आता अभिजित दिपके यांच्या पाठिंब्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सलग दुसऱ्या दिवशी राजकीय नेत्यांची साथ मिळाली आहे. त्यामुळे गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल सरकारला आता अधिक गांभीर्याने घ्यावी लागणार असून, आगामी काळात हा प्रश्न राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.

यावेळेस मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वर्ग व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.