राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्याला भाजपाचा विरोध रास्ता रोको आंदोलन!
नाशिक प्रतिनिधी मनिष तिवडे

नाशिक लोकसभेचे विरोधी पक्ष नेते काँग्रेस खासदार राहुल गांधी हे आज 02 सप्टेंबर 2026 रोजी नाशिक दौऱ्यावर आहे नाशिक मध्ये काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या निवासी प्रशिक्षण शिबीरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या दहा दिवसांपासून नाशिकमध्ये संगठन सृजन अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांचे निवासी प्रशिक्षण सुरु आहे. या प्रशिक्षण शिबीराच्या समारोपासाठी राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल झाले आहे तर राहुल गांधी यांच्या दौऱ्याला विरोध,निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रास्ता रोको आंदोलन केले.
केंद्र सरकारने मांडलेल्या ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन विधेयकाला’ महिला आरक्षण विधेयक याला काँग्रेसने विरोध केलेला आहे. भाजपच्या खासदार, आमदार, महिला पदाधिकारी, आणि महिला नगरसेवकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. यावेळी खासदार डॉ.भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, महापौर हिमगौरी आडके-आहेर, रश्मी हिरे-बेंडाळे, शहराध्यक्ष सुनील केदार, दिनकर पाटील, सुधाकर बडगुजर, यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, काँग्रेस कार्यालय आणि परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
केंद्र सरकारच्या ‘नारी शक्ती वंदन विधेयकाला,महिला आरक्षण विधेयक विरोध केल्याचा आरोप करत नाशिक भाजपच्या महिला पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्याचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे निषेध व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान भाजपच्या महिला कार्यकर्त्या आणि प्रमुख पदाधिकारी यांनी काळे कपडे परिधान करून तसेच हाताला काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. काँग्रेसने महिला आरक्षणाला विरोध करून महिलांच्या अधिकारांवर गदा आणली आहे, असा आरोप करत भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.( राहुल गांधी गो बॅक )
महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देणाऱ्या विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या भूमिकेचा आंदोलकांनी तीव्र शब्दांत निषेध केला. काँग्रेसने महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते व इतर पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते.



