महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आंबेडकरी समाजाच्या वतीने नाशिकमध्ये…
नाशिक प्रतिनिधी

नाशिक शनिवारी, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी ‘एल्गार महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती, नाशिक जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महामोर्चाचे नेतृत्व समाजरक्षक अर्जुन पगारे करणार असून, तब्बल ५९ जाती या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे

शनिवारी सकाळी गोल्फ क्लब मैदान येथून महामोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर त्र्यंबक नाका, खडकाळी सिग्नल, शालिमार या मार्गाने मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचणार आहे. येथे महामोर्चाचा समारोप होऊन जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे
प्रस्तावित आरक्षण उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातीतील विविध घटकांच्या आरक्षणाच्या हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी प्रमुख मागणी महामोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधत आरक्षणाच्या हक्कासाठी आंबेडकरी समाजाचा एकजुटीचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. मोठ्या संख्येने समाजबांधवांनी महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे
महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष प्रकाश पगारे सर अर्जुन नाना पगारे मार्गदर्शक माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य
यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी सरचिटणीस सनीभाई रोकडे, कार्याध्यक्ष प्रवीण पगारे, माजी नगरसेवक कुणाल वाघ, तसेच संजय भालेराव, काळूजी काळे, माया काळे, किशोर गांगुर्डे, राहुल जगताप, एकनाथ मोरे, प्रवीण गांगुर्डे बाळासाहेब शिंदे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आरक्षणाच्या प्रश्नावरून नाशिकमध्ये आता आंबेडकरी समाजाच्या विविध घटकांनी एकत्रित भूमिका घेतल्याने २२ ऑगस्टचा महामोर्चा शासनासाठी लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.



