
श्रावण रक्षाबंधन गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी असे सलग सण उत्सव होणार आहे साखरेच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सणासुदीच्या काळात घरगुती गोडधोड, मिठाई तसेच विविध खाद्यपदार्थांसाठी साखरेची मागणी वाढत असते. मात्र, गेल्या काही दिवसांत साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे यंदा सणांचा गोडवा महागण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी 60 काही ठिकाणी 65 रुपये किलोने साखरेचे दर आहे
21 ते 22 दिवसापूर्वी साखरेचा दर 4 हजार 100 ते4 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल होता त्यानंतर दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत 150 रुपयाची वाढ झाली गेल्या काही दिवसापासून सतत वाढ होत आहे दिवसाला 300 ते 400 रुपये भाव वाढ होत आहे असे व्यापारांचे म्हणणे आहे सध्या साखरेचा घाऊक दर 7 हजार रुपये क्विंटल म्हणजे 70 रुपये किलो पर्यंत पोहोचला आहे येणाऱ्या काही दिवसात 80 रुपये किलो भाव जाण्याची शक्यता आहे



