आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीराजकीय

नाशिक एज्युकेशन सोसायटीतर्फे कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन

नाशिक वार्ताहर

नाशिक एज्युकेशन सोसायटीतर्फे संस्थेतून सेवानिवृत्त झालेल्या शालेय पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सोहळा सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता प. सा. नाट्यगृह, टिळकपथ, नाशिक येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. भरत केळकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके राहणार आहेत.

या कृतज्ञता सोहळ्यास संस्थेचे सर्व आजी – माजी पदाधिकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी तसेच हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, अॅड. जयदीप वैशंपायन, कार्यवाह राजेंद्र निकम व उत्सव समारंभ समितीप्रमुख प्राजक्ता क्षीरसागर यांनी केले आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.