
भाटगांव– देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते लाडके आमदार श्री.राहुल दौलतराव आहेर यांच्या आमदार निधी अंतर्गत भाटगाव ता.चांदवड येथे मारुती मंदिर समोरील सामाजिक सभागृह सभा मंडप भूमिपूजनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे भूमिपूजन ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. हिराबाई यशवंत पगार यांच्या हस्ते संपन्न झाला. तत्तप्रसंगी उपसरपंच श्री.किरण भवर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, वारकरी भुषण ह.भ.प.समाधानजी महाराज पगार तसेच समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ भाटगाव उपस्थित होते.



