राजकीयसामाजिक

सप्तशृंगी गडावरती चैत्र उत्सवाचा काळातच पाण्याची टंचाई 

सोमनाथ मानकर

सप्तशृंगीगड

गडावरील विहिरींनी गाठला तळ साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक रोज येत असतात परंतु खास खानदेशी बांधवांसाठी आनंदाचा सण म्हणजे चैत्र उत्सव या उत्सवासाठी लाखोच्या संख्येने खानदेशातून भाविक गडावरती येत असतात आणि हा चैत्र उत्सव सुरू होत आहे 23/3/….3/3/2026 पर्यंत आणि या काळामध्ये शिवालय तलावाच्या परिसरामध्ये देवी संस्थांच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याचे व्यवस्था केलेले असते त्यामुळे या ठिकाणी जास्त भावीक असतात परंतु या ठिकाणी सगळ्यात मोठी पाण्याची समस्या निर्माण होणार आहे शिवालय तलाव परिसरामध्ये प्रशासनाच्या वतीने या तारखेमध्ये किमान पाण्याचे दोन टॅंकर उपलब्ध करून द्यावे अशी सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांची प्रामुख्याने मागणी आहे कारण या ठिकाणी येणारे भाविक भक्त हे पाण्यासाठी वन वन करतात त्यामुळे सप्तशृंगी गड ग्रामपंचायत व शासकीय बांधकाम विभाग यांच्याकडून गेल्या कित्येक वर्षापासून पाणी हे टॅंकर उपलब्ध करण्याची सोय असल्यामुळे यांनी त्वरित हे टॅंकर उपलब्ध करावे अशी मागणी गडावरील ग्रामस्थ करत आहे

 

यात्रा उत्सव काळात पाण्याची टंचाई दरवर्षी निर्माण होते परंतु यावर्षी उन्हाळा जास्त असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने शिवालय तलाव तसेच गावातील अनेक रस्त्यांवरती पाण्याचे टँकर येतात परंतु यात्रेच्या शेवटच्या काळात येतात तोपर्यंत भाविकांचे खूप हाल होतात तरी प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष द्यावे व आजपासूनच पाण्याचे टँकर त्वरित सुरू करावे

राजेंद्र भोंडवे शिवालय तलाव ग्रामस्थ

शिवालय तलावाच्या परिसरासह आपण गावात जागोजागी पाण्याच्या टाक्या ठेवणार आहेत नळासह तसेच ग्रामपंचायत वतीने पाण्याच्या टँकर सुद्धा सुरुवात करणार आहोत

सरपंच रमेश पवार सप्तशृंगी गड

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.