
भाटगांव – चांदवड तालुक्यातील भाटगांव येथे भारताचा 79 वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम शालेय विध्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढून ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रीय झेंड्यास सलामी देत ध्वजारोहण करण्यात आले. नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये भाटगांवचे भूमीपुत्र भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले अशोक पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि नंतर नूतन माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण करण्यात येऊन प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या विध्यार्थ्यांना मान्यवारांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षेकतर कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.



