ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रसामाजिक

MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी नाशिक युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक दिं.७ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश (बबलु) खैरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा युवक कॉग्रेस जयेश पोकळे यांच्या नेतृत्वात जेष्ठ नेते राजेंद्र बागुल, माजी नगरसेवक रमेश जाधव नाशिक शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, शहर सरचिटणीस अरुण दोंदे, NSUI प्रदेश सरचिटणीस समाधान बागुल, सोमनाथ मोहिते, ॲड. सुमित चोपडे, NSUI शहर पदाधिकारी हर्षवर्धन कापडणीस यांच्यासह MPSC चे राहुल दराडे, गणेश शहाणे, निलेश मते, निखिल खरोटे, शिवा भडांगे, हार्दिक कोचर, ओमकार कागंणे हे विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाकडुन अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना निवेदन सादर केले.

 

निवेदनात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत निवेदनातून प्रमुख मागण्या :

• परीक्षांचे वेळापत्रक व पारदर्शकता: MPSC च्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक वेळेवर जाहीर करण्यात यावे आणि परीक्षा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणली जावी.

• अडकलेल्या नियुक्त्या त्वरित करा: परीक्षा उत्तीर्ण होऊनही महिनोनमहिने रखडलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या तात्काळ करण्यात याव्यात.

• वयोमर्यादेत सवलत: कोरोना काळ आणि परीक्षांच्या विलंबामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अतिरिक्त संधी व वयात सवलत मिळावी.

• जागांमध्ये वाढ: विविध सरकारी विभागांमधील रिक्त पदे लक्षात घेता, आगामी जाहिरातींमध्ये पदांची संख्या वाढवण्यात यावी.

तीव्र आंदोलनाचा इशारा:

निवेदन सादर करताना युवक कॉंग्रेस अध्यक्ष जयेश पोकळे यांनी सांगितले की, “MPSC चा विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून आपले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. विद्यार्थ्यांच्या या न्याय्य मागण्यांवर जर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर युवक काँग्रेस जिल्हाभरात तीव्र आंदोलन छेडेल, ज्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल.”

यावेळी युवक काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि MPSC चे विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.