नाशिक शहर काँग्रेस कमिटीकडुन लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी व इंडिया आघाडीचे खासदार यांच्या अटकेचा निषेध करत ८ ऑक्टोबर भारतीय लोकशाहीसाठी “काळा दिवस” म्हणून साजरा
नाशिक : प्रतिनिधी

नाशिक दिं. ८ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष निलेश (बबलु) खैरे यांच्या नेतृत्वाखालील
आज लोकशाहीचा ” काळा दिवस” म्हणून साजरा करत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी जी यांच्या नेतृत्वाखाली INDIA आघाडीचे खासदार निवडणूक आयोगाकडून उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी शांततेच्या मार्गाने जंतर-मंतरकडे जात असताना त्यांना अडवण्यात आले आणि त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, श्री. राहुल गांधी जी, श्रीमती प्रियंका गांधी जी, तसेच आमचे ज्येष्ठ नेते आणि INDIA आघाडीचे खासदार यांच्याशी पोलिसांनी अमानुष वर्तन केले, लाठीचार्ज केला आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. केंद्रातील भाजपा सरकारच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेस कमिटीकडुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी रोड, नाशिक येथे जोरदार निर्देशन आंदोलन करण्यात आले.
विरोधी पक्षनेते आणि जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर झालेला हा हल्ला म्हणजे स्वतः भारतीय संविधानावर झालेला हल्ला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आजचा दिवस “भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस” म्हणून घोषित केला.
तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवले जाईपर्यंत आणि आपल्या निवडणूक व्यवस्थेची अखंडता पूर्णपणे पुनर्स्थापित होईपर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा लढा अविरतपणे सुरू ठेवणार असुन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ” ज्ञानेश कुमार कहा मिंलेगे, बीजेपी के दप्तर मे ” ” चोट चोर कहाॅ मिंलेगे, बीजेपी के दप्तर में ” ” ज्ञानेश कुमार राजीनामा द्या, राजीनामा द्या.., ” वोट चोर, गद्दी छोड ” भारतीय संविधानाचा विजय असो, ” डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, ” अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी प्रदेश सचिव प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड, राजीव गांधी पंचायत राजचे प्रदेशाध्यक्ष अविनाश उमणकर, माजी नगरसेवक रमेश जाधव, उल्हास सातभाई, उध्दव पवार, विक्रांत वावरे, महिला अध्यक्षा स्वाती जाधव, अनुसूचित जाती विभाग शहराध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, युवक काँग्रेस अध्यक्ष जयेश पोकळे, गौरव सोनार, ओबीसी विभाग शहराध्यक्ष सुदेश मोरे, मध्य ब्लॉक अध्यक्ष जाकीर अत्तार, सिडको ब्लाॅक अध्यक्ष भारत पाटील, पंचवटी ब्लाॅक अध्यक्ष अभिजित राऊत, अरूण दोंदे, सोशल मिडीया शहराध्यक्ष हर्षल पवार, संदिप वाघ, वृंदा शेरे, मंगेश लहांमगे, विलास निकुंभ, मुश्ताक कुरेशी, दत्तात्रय सोनवणे, शंकर जाधव, राजेंद्र मोकळ, सोमनाथ मोहिते, इसाक कुरेशी, शशी शिंदे, गुड्डी आबा, डाॅ.सुचेता बच्छाव, सजय पवार, साजिद खान, कैलास कडलग, प्रविण काटे, संतोष कस्तुरे, भालचंद्र पाटील, अनिल बहोत, गोकुळ राव, आदिनाथ नागरगोजे, ॲड सुरज चव्हाण, ॲड. कोणाक कोठारी, स्वप्नील पिसे, अमोल सोनवणे, गोरख साळवे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थितीत होते



