ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

मालसाने- सोग्रस येथे भीषण अपघात, शाळकरी मुलांना भरधाव वाहनाची धडक अनेकजण गंभीर जखमी

ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव – चांदवड तालुक्यातील सोग्रस मालसाने येथे सायंकाळी 5 घडलेल्या भीषण अपघातात शाळकरी मुलांना महामार्गावर वेगाने येणाऱ्या टाटा एसी (छोटा हत्ती ) वाहनाने मालसाने येथील शेलू नदी पुलावर जोरदार धडक दिली. या अपघातात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या अपघातात एकाचा मृत्यू तर 10 ते 12 मुल गंभीर जखमी झाले आहे. ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत आढळला असून स्थानिक नागरिक व नातेवाईकांनी मुबंई-आग्रा महामार्ग सोग्रस येथे तब्बल साडेतीन तास रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हा पोलीस अधीक्षक (SP)साहेब श्री. बाळासाहेब पाटील आणि शालेय शिक्षण मंत्री, माननीय दादा साहेब भुसे आणि माननीय आमदार श्री. राहुल दादा आहेर यांनी आंदोलकांना लेखी आश्वसन दिल्या नंतर तब्बल साडेतीन तासानंतर रात्री साडेआठ वाजता महामार्ग खुला करण्यात आला.जखमींपैकी समृद्धी पवार (वय 13) गंभीर जखमी असून, आदित्य गांगुर्डे (वय 04) आणि दीपक केदारे (वय 16) यांच्यासह इतर काही विद्यार्थ्यांना देखील गंभीर दुखापत झाली आहे. रुग्णालयात डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे तात्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच तातडीने आवश्यक उपचार आणि सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी महामार्गावरील वेग मर्यादा आणि सुरक्षा उपाय याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.