आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींचा हॉलीबॉल संघ चिपळूण रत्नागिरी येथे रवाना..

ज्ञानेश्वर पोटे

गौतमनगर :- क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींचा हॉलीबॉल संघ दिनांक २८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा संघ प्रथमच पुणे विभागाकडून प्रतिनिधित्व करणार आहे. प्रशिक्षक इसाक सय्यद आणि राजेंद्र आढाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली १२ खेळाडूंचा हा संघ चिपळूण (रत्नागिरी) येथे रवाना झाला आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या गौतम पब्लिक स्कूलच्या संघामध्ये खेळाडूंत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कु. कल्याणी वावधने, कु. श्रावणी अकोलकर आणि कु. राजलक्ष्मी निर्मळ, अहिल्या नगर जिल्ह्यातील कु शिवस्वरा आढाव तसेच नाशिक जिल्ह्यातील कु. अनुष्का पवार, कु. तेजस्विनी ढोणे, कु. गौरी रायते, कु. प्रज्ञा रायते, कु. आराध्या भागवत, कु. स्नेहा देवरे, कु. स्नेहल कुरणे व कु. सायली शिंदे यांचा समावेश आहे. स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख यांनी संस्थेच्या वतीने खेळाडू व प्रशिक्षक यांना उत्कृष्ट कामगिरी करून गौतम पब्लिक स्कूलचा व पुणे विभागाचा नावलौकिक वाढवावा अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.

गौतम पब्लिक स्कूल मध्ये दिनांक २८ पासून शालेय विभागीय हॉकी स्पर्धेलाही सुरुवात झाली आहे. स्कूलचे प्राचार्य नूर शेख व सोलापूरचे माजी क्रिडा मार्गदर्शक जरार कुरेशी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेत अहिल्या नगर, सोलापूर, आणि पुणे जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. गौतम पब्लिक स्कूल चे १४ व १७ वयोगटातील मुलांचे हॉकी संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

स्कूलच्या क्रीडा विभागामार्फत विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या खेळांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जात आहे. प्राचार्य नूर शेख यांच्या नेतृत्वाखाली फिजीकल डायरेक्टर रमेश पटारे सर, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव सर,, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद सर, फुटबॉल प्रशिक्षक महेश गोंडे सर सर्व हाऊस मास्टर आणि पर्यवेक्षिका कु. ज्योती शेलार मॅडम या सर्वांचे खेळाडूंना मार्गदर्शन मिळत आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.