ताज्या घडामोडी

नाशिक शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या शहराध्यक्षपदी ज्ञानेश्वर काळे यांची नियुक्त 

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या नाशिक शहराध्यक्षपदी ज्ञानेश्वर काळे यांची अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभाग राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेश प्रभारी माजी आमदार राजेंद्र गौतम पाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली असून त्यांच्या सोबत नाशिक शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या शहराध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

यापूर्वी ज्ञानेश्वर काळे यांनी गेली पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळापासून नाशिक जिल्हा अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्ष काम करताना पारनेर विधानसभा प्रभारी म्हणुन काम पाहत आहेत.

त्यांचा जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात विविध सामाजिक व राजकीय, शैक्षणिक विषयी आंदोलनं करुन विविध समाजघटकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे अभ्यासु व आक्रमकते सोबत त्यांचा जनसंपर्क आणि संघटनात्मक कौशल्य लक्षात घेऊन अनुसूचित जाती विभाग राष्ट्रीय समन्वयक सिध्दार्थ हत्तीअंबीरे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

 

या नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर श्री काळे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, जेष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सिध्दार्थ हत्तीअंबीरे, अनिरुद्ध वनकर, राजेश लाडे, प्रशांत पवार यांचे आभार व्यक्त केले.

 

त्याचसोबत धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डाॅ.शोभा बच्छाव, जेष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे (पाटील), शरदराव आहेर, प्रदेश सचिव प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड, शहराध्यक्ष निलेश (बबलु) खैरे, नाशिक जिल्हा कॉग्रेस उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर आदींसह स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वर काळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.