SIR मोहिमेअंतर्गत प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावं समाविष्ट करण्याकरिता जोरदार मोहिम राबवा – ॲड. संदिप भैय्यासाहेब पाटिल
नाशिक : प्रतिनिधी

नाशिक दिं. १९ सप्टेंबर, नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीकडुन आयोजित SIR मोहिमेअंतर्गत प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आलेली दावे हरकती यांच्याव्दारे नावं समाविष्ट करण्याकरिता अंत्यत कमी म्हणजेच दहा बारा दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. हया कालावधीत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नवीन मतदार तथा वगळण्यात आलेली नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे अंत्यत बारकाईनं लक्ष ठेवून आहेत त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाकडून BAL 1 व BAL 2 नेमण्यात आलेले आहेत त्यांचे प्रशिक्षण सुध्दा घेऊन सर्वच तालुक्यात घेण्यात आल्याचं जिल्हा प्रभारी ॲड. संदीप भैय्यासाहेब पाटिल यांनी नमुद केले. ते काँग्रेस भवन, महात्मा गांधी रोड, नाशिक येथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले,
नाशिक शहरातील चार मतदारसंघात म्हणजेच प्रामुख्याने सरासरी एक लाख ते दोन लाखाच्या मतदाराची नावे वगळण्यात आलेली आहे. त्या अनुषंगानेच मतदारांपर्यंत पोहोचून जी चुकीने मतदाराची नावे मतदारयादीतुन कमी झाली असल्यास तसेच नव्याने निर्माण झालेले मतदार यांची त्या – त्या विधानसभा मतदारसंघात नावे समाविष्ट करण्यासाठी सर्वपरीने परिश्रम घेऊन BAL1 व BAL 2 आणि ब्लॉक व तालुकाध्यक्ष यांनी संयुक्तपणे जोरदार मोहिम राबविण्याचे आवाहन निरिक्षक भैय्यासाहेब पाटिल यांनी केले.
तसेच बैठकीचे प्रास्ताविक नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश (बबलू) खैरे यांनी केले. तसेच जिल्हा कॉग्रेस उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर यांनीही पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी चांदवड तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोके व चांदवड शहर अध्यक्ष ॲड अन्वर पठाण व तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड शिवसेना शिंदे गटाचे माजी शहरप्रमुख मुकेश कोतवाल व मित्रपरिवार आणि संयुक्ता बनकर यांचा भैय्यासाहेब पाटिल यांच्या उपस्थितीत व दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर यांच्या नेतृत्वाखालील बहुसंख्येने प्रवेश केला.
यावेळी बैठकीचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर काळे यांनी केले तसेच त्यांची नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या शहराध्यक्ष पदी नियुक्तीबद्दल बैठकी दरम्यान नाशिक जिल्हा प्रभारी भैय्यासाहेब पाटिल यांच्या हस्ते व नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश (बबलु) खैरे, उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळ, दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, ओ.बी.सी. प्रदेश उपाध्यक्ष विजय राऊत, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती जाधव यांच्या उपस्थितीत शाल व फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
बैठकीसाठी प्रा.अनिल पाटील, जाकीर अत्तार, भरत पाटील, अभिजित राऊत, चंद्रकांत ठोके, अन्वर पठाण, अरूण दोंदे, संदिप वाघ, दिनकर निकम, कारभारी गांगुर्डे, राजेंद्र सोणवंशी, गणपत चौधरी, धर्मराज जोपळे, आकाश गरड, मधुकर शेलार, साहेबराव डोमसे, प्रकाश पिगंळ, नारायण पाटील, रामदास धांडे, गोरख सांगळे, तुकाराम जाधव, गणेश कोठुळे, बाळासाहेब कुक्कडे, निवृत्ती कातोरे, अनिल मोरे परशराम भोये, यादव भोये आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.



