आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

एका प्रांताधिकाऱ्याविरोधात 800 तलाठी, ग्रामसेवक एकवटले, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या!

नाशिक प्रतिनिधी

आज 15 सप्टेंबर 2026 रोजी, इगतपूरीचे प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्याविरोधात 800 तलाठी, ग्रामसेवक एकवटले असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाले बसले आहेत.

नाशिक जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. त्याला कारणही तसच आहे. एका प्रातांधिकाऱ्याविरोधात जिल्ह्यातील जवळपास 800 तलाठी आणि ग्रामविकास अधिकारी एकवटले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.

 

फेरफार नोंदी आणि महसूल कामकाजात अनियमितता असल्याचे तपासणीत उघड झाल्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा इगतपूरीचे प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी इगतपुरी तालुक्यातील एक मंडलाधिकारी व पाच तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. वेतनवाढही रोखली होती. या कारवाईविरोधात तलाठ्यांनी मिळून पवन दत्ता यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले असून निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे.

 

निलंबनाची कारवाई करणाऱ्या तलाठी तसेच मंडलाधिकाऱ्याला कारवाईपूर्वी कोणत्याही प्रकारची नोटीस देण्यात आली नाही. खुलासा न मागवताच कारवाई केल्याने ती कारवाई बेकायदेशीर असल्याचे तलाठी संघाचे म्हणणे आहे.

 

प्रांत अधिकारी पवन दत्ता यांचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप तलाठी महासंघाने केला आहे. प्रांताधिकार्‍यांनी बेकादेशीर निलंबन केल्याचा आरोप तलाठी महासंघाने केला आहे. मंडलाधिकारी व तलाठ्यांवरील निलंबन मागे घेण्यासह इतर मागण्या मान्य कराव्या अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे.

 

प्रशासकीय सेवेतील आपल्या विविध मागण्यांसाठी 15 तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी एकत्र येत आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे, प्रांताधिकाऱ्यांविरुद्ध जवळपास 800 तलाठी व ग्रामविकास अधिकारी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास बुधवार पासून कामबंद आंदोलन केलं जाईल असा इशाराही तलाठी महासंघाने दिला आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.