नाशिकमधील खड्ड्यां विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा महापालिकेवर ‘जनआक्रोश मोर्चा
नाशिक प्रतिनिधी

- नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून या समस्येवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेपक्ष आक्रमक झाला आहे. खड्ड्यांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज नाशिक महानगरपालिकेवर खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली जोरदार ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन वर धडकला, ज्यामध्ये शिवसैनिकांसह सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी शहरातील खड्ड्यांमुळे प्राण गमवावे लागलेल्या सात नागरिकांचे फोटो मोर्चाच्या ठिकाणी लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच एका शिवसैनिकाने यमराजाचा वेश परिधान केला होता. “नाशिककरांच्या मृत्यूला मी नाही, तर महापालिका प्रशासन जबाबदार आहे,” असा संदेश या माध्यमातून देण्यात आला. तर खड्डे तातडीने न बुजवल्यास सत्ताधारी मंत्री, आमदार आणि नगरसेवकांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला.
यावेळेस नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले नाशिक महानगरपालिका हद्दीतील जो खड्ड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे त्यासाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा जन आक्रोश आंदोलन काढण्यात आला आहे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणे हीच खरी शिवसेना अशी शिवसेनेची ओळख आहे नाशिक मध्ये होत असलेल्या विकासाला आमचा विरोध नाही पण कोणत्या पद्धतीने होतोय हा मोठा प्रश्न आहे प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी हा मोर्चा काढला आहे
जन आक्रोश आंदोलन मध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत राज्यसभा खासदार, राजाभाऊ वाजे खासदार, रवींद्र मिलेकर शिवसेना उपनेत, माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख डी.जे.सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, नगरसेवक केशव पोरजे, बालवीर कौर, योगेश गाडेकर,गुलजार कोकणी, संजीवनी हंडोरे, वैशाली दाणी, ऋतिका पाटील, भारत ताजनपुरे, सागर कोकणे जिल्हाप्रमुख युवा सेना, अभिजित गवते,सचिन बांडे, मयुरेश कोथमिरे, व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते



