आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी या हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात एकत्र येऊन आवाज उठवा

वार्ताहर : नाशिक

नाशिक-लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी या हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात एकत्र येऊन आवाज उठवून देशात ‘करो किंवा मरो’ ची परिस्थिती असल्याचे सांगत भाजप सरकार विरोधात ‘चले जाव’ चा नारा देऊन सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांकरिता आपण जबाबदारीने लढावं लागेल ते नाशिक शहर काँग्रेस कमिटीकडुन आयोजित क्रांती दिनानिमित्त काँग्रेस भवन महात्मा गांधी रोड, नाशिक येथे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. सुरुवातीला त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन ध्वजाला सलामी देत वंदे मातरम व राष्ट्रगीताचे सामुहिक गीत गात ‘ भारत माता की जय ‘ ‘ वंदे मातरम ‘ अश्या घोषणा देण्यात आल्या.

ते पुढे म्हणाले की देशात सध्या महात्मा गांधींच्या १९४२ मधील ‘करो किंवा मरो’ सारखीच बिकट परिस्थिती निर्माण झाली असून पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी समजुन घेऊन त्यांच्या न्यायहक्कांकरिता अधिक आक्रमक व धैर्याने काम करण्याची आवश्यकता असल्याच नमूद करुन आजच्या शिक्षण व्यवस्थेचा उडलेला बोजवारा, बेरोजगांराचा प्रश्न, महिलांवरील अत्याचार, राम मंदिर दानाची चोरी हे मुद्दे प्रचंड महत्वाचे असताना याबाबत सरकार कुठलीच जबाबदारी स्विकारायला तयार नाही. म्हणून विरोधी पक्ष नेते राहुल गांधी वेळोवेळी याविषयी संसदेत व संसदेच्या बाहेर लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेटून सर्वसामान्यांचा आवाज बनले आहेत. म्हणून आपलीही मोठी जबाबदारी असल्याचं भान ठेवून यात अधिकाधिक लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काम करावं असे आवाहन श्री खैरे यांनी केले.

यावेळी माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, सेवादलाचे पदाधिकारी सिध्दार्थ गांगुर्डे, धोंडीराम बोडके, उमेश चव्हाण, जेष्ठ नेते उध्दव पवार, पोपटराव धात्रक, ज्ञानेश्वर काळे, अभिजित राऊत, तानाजी गायधनी, ज्युली डिसुझा, वृंदा शेरे, गौरव सोनार, संदीप वाघ, भालचंद्र पाटील, संतोष कस्तुरे, हर्षल पवार, संतोष ठाकूर, अशोक शेंडगे, योगेश गांगुर्डे, कैलास कडलग, प्रकाश माळी, कुरेशी, सईद मनियार, जावेद पठाण, इम्तियाज पठाण, अरुण दोंदे, शशिकांत कदम, मयुर मोटकरी, शिवाजी कहार, दर्शन वाघमारे, विजय चव्हाण आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.