वीर बिरसा मुंडा हे इंग्रजांच्या राजवटी विरोधात व आदिवासींच्या न्याय हक्कांकरिता लढणारा खरा संघर्ष योध्दा
नाशिक : वार्ताहर

नाशिक : इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध आदिवासींना एकत्र करुन जल, जलय आणि जमीन वाचवण्यासाठी मोठा लढा उभा करुन समाजात असलेली अंधश्रद्धा व व्यसनाधीनता दूर करत शिक्षणाचे महत्त्व सांगून जनजागृती करणारे आणि आदिवासींच्या न्याय हक्कांकरिता लढणारा खरा संघर्ष योध्दा होते असे प्रतिपादन नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जमाती विभागाच्या वतीने काँग्रेस भवन, महात्मा गांधी रोड, नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात केले तसेच सुरुवातीला वीर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त व जागतिक आदिवासी दिनाच्या उपस्थितींना शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर नाशिक शहर काँग्रेस अनुसूचित जमातीचे अध्यक्ष व आयोजक संतोष ठाकूर यांनी वीर बिरसा मुंडा यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आज खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांची आणि त्यांनी केलेल्या संघर्ष करण्याची प्रेरणाच आदिवासी समाजाला तारु शकेल. त्यामुळे समाजाने एकत्रित येऊन त्यांचे विचार आत्मसात करावे असे नमुद केले.
तसेच प्रा.भालचंद्र पाटील व ज्ञानेश्वर काळे यांनीही वीर बिरसा मुंडा यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, जेष्ठ नेते उध्दव पवार, पोपटराव धात्रक, ज्ञानेश्वर काळे, अभिजित राऊत, तानाजी गायधनी, ज्युली डिसुझा, वृंदा शेरे, गौरव सोनार, संदीप वाघ, भालचंद्र पाटील, संतोष कस्तुरे, हर्षल पवार,सिध्दार्थ गांगुर्डे, धोंडीराम बोडके, उमेश चव्हाण, अशोक शेंडगे, योगेश गांगुर्डे, कैलास कडलग, प्रकाश माळी, कुरेशी, सईद मनियार, जावेद पठाण, इम्तियाज पठाण, अरुण दोंदे, शशिकांत कदम, मयुर मोटकरी, शिवाजी कहार, दर्शन वाघमारे, विजय चव्हाण आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



