क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेत रस्ता चळवळीचे प्रणेते शरद राव पवळे व चळवळीचे जिल्हा कृती समिती सदस्य तसेच असंख्य रस्ता पीडित शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांना निवेदन सादर

सोमनाथ मानकर 

मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद शेत रस्ते योजना शासन शुद्धिपत्रक दिनांक 25 /03 /2026 नुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या शासन शुद्धिपत्रक 25 मार्च 2026 अनुषंगाने ʼʼ मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पानंद रस्ता योजना” प्रभावीपणे राबविण्या बाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत सदर शासन निर्णयानुसार गाव नकाशा वरील शासकीय पानंद रस्त्यावरील अतिक्रमण सात दिवसांच्या आत काढणे बंधनकारक करण्यात आलेले आहे परंतु आमच्या परिसरामध्ये अद्यापही अनेक ठिकाणी पानंद शेत रस्त्यावरील अतिक्रमण कायम असून शेतकऱ्यांना शेती कामासाठी ये- जा करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत पावसाळा जवळ येत असल्यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर बनत असून शासनाच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे, तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे आपणास विनंती नसून खालील प्रमाणे ठोस मागण्या करण्यात येत आहेत.

1) गाव नकाशावरील शिवपानंद शेत रस्त्यांवरील सर्व अतिक्रमण धारकांना तात्काळ नोटीस देण्यात यावी.

2) सात दिवसांच्या आत अतिक्रमण न काढल्यास महसूल यंत्रणेमार्फत सक्तीची अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करावी.

3) पावसाळा लक्षात घेता पानंद रस्त्यांचे तात्काळ मोजणी व सीमांकन करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत.

4) तहसीलदार व उपविभागीय अधिकारी (प्रांत )यांच्याकडे प्रलंबित असलेल्या शेत वहिवाट पानंद रस्त्या विषयक प्रकरणांचे निरीक्षण करून ती तातडीने निकाली काढावीत.

5) शासन निर्णयानुसार अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करून संबंधित शेतकऱ्यांचे फार्मर आयडी व आधार नंबर ब्लॉक करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी.

6) संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कामाचे वेळापत्रक जाहीर करावे.

7) शिव पानंद रस्ते मोकळे करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी.

8) क्षत्रिय समिती स्थापन करून दर महिन्याला बैठक आयोजित करावी व समितीस कालबद्ध कार्यक्रम देण्यात यावा.

9) शिवपानंद शेत रस्ते खुले करताना हद्द निश्चितीच्या वेळी ग्रामपंचायत ,पंचायत समिती व इतर उपलब्ध निधी प्रदान करण्यात यावा.

10) मोजणी व हद्दी खुणा पूर्ण झालेल्या रस्त्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा शासन निर्णयानुसार प्रति किलोमीटर 15 लाख रुपये निधी उपलब्ध करून तत्काळ कामे सुरू करण्यात यावीत.

11) निकाली झालेल्या शेत वहिवाट रस्ते प्रकरणे अतिक्रमण मुक्त करण्यासाठी संबंधित कायदेशीर कलमानुसार कार्यवाही करून स्थानिक पोलीस मार्फत मोफत पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात यावा.

12) नकाशावरील व शिव- पानंद शेत रस्त्यांची तातडीने मोजणी करून सीमा निश्चित करण्यात यावी.

13) सदर रस्त्यांवर कायमस्वरूपी दगडी खुणा नंबरिंग करण्यात यावे.

14) तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतकडून तातडीने, युद्ध पातळीवरती शेत पानंद रस्त्यांचे प्रस्ताव मागून घेण्यात यावेत. ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव येण्यास वेळ लागत असेल तर वैयक्तिक लाभार्थ्यांनी दिलेल्या अर्ज ही ग्राह्य धरण्यात यावेत. सद्यस्थितीमध्ये नजीकच्या दोन महिन्यांमध्येच पावसाळा सुरू होणार असल्याने उपरोक्त नमूद कार्यवाही तातडीने करण्याबाबत नियोजन करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर निदर्शने, आंदोलन करण्यात येईल याची कृपया गंभीरतेने नोंद घ्यावी अशी विनंती निवेदन देणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेत रस्ते चळवळीचे प्रणेते शरदराव पवळे साहेब, रवींद्र खुडे ,नाथाभाऊ शिंदे, सुरेश भुजबळ, भिका पवार, शांताराम मानमंद, सोमनाथ कुंभार्डे ,गंगाधर वलवे ,नागेश भोसले ,एडवोकेट राकेश सोनवणे, नानाजी शिंदे, दीपक घुगे ,काशिनाथ साबळे ,ज्ञानेश्वर काकड व इतर सर्व रस्ता पीडीत शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.