आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रसामाजिक

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त विषमुक्त शेती अभियान राबवण्यात आले

अहिल्यानगर जिल्हा संपादक कावेरी भिगारदिवे

चिंचोली गाव (ता. राहुरी) : महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने चिंचोली गाव येथे विषमुक्त शेती अभियान राबविण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.

राष्ट्रीय विश्वगामी शेतकरी संघाचे उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी मोहन कांबळे यांनी चिंचोली ग्रामपंचायत येथे उपस्थित शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजावून सांगितले. अति रासायनिक खत व औषधांच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होत असून जमिनीची सुपीकता कमी होत आहे. तसेच जलप्रदूषण वाढत असून शेती उत्पादनावरही त्याचा विपरीत परिणाम होत असून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास जमिनीची सुपीकता टिकवून ठेवता येईल आणि विषमुक्त अन्न उत्पादनाला चालना मिळेल, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भारतीय मानांकन प्राप्त इंडिया ग्रो सेंद्रिय औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीसाठी उपलब्ध उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

 

या कार्यक्रमाला राहुरी तालुका सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण हरिषचंद्रे,राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राहुल वैराळ, समाज कार्य संघ तालुका संघटक राजेंद्र भोसले, तालुका अध्यक्ष संगीता भोसले, तालुका संपर्क प्रमुख सुभाष शिरसाठ, तालुका उपाध्यक्ष मंजुषा मिसाळ, समाजकार्य सदस्य राजू शेख, सरपंच शोभाताई लाटे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब लाटे, सदस्य बाळासाहेब पारखे, राधु काळे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी चिंचोली गाव ग्रामपंचायत याचे सहकार्य लाभले

संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://www.facebook.com/share/v/1Bha6Jtu9w/

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.