आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी जयंती व नरेंद्र दाभोलकर, मुरलीधर माने यांचा स्मृतिदिनी नाशिक काँग्रेसकडुन ” हक्कांच शहर ” अभियानाची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत शुभारंभ

वार्ताहर : नाशिक

नाशिक-भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त नाशिक शहर काँग्रेस कमिटीकडुन चित्रफितीव्दारे ” हक्कांच शहर ” ह्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडुन सुचित केलेल्या अभिनयाचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नाशिक शहर काँग्रेस कमिटीकडुन काँग्रेस भवन, महात्मा गांधी रोड, नाशिक येथे करण्यात आला. सुरुवातीला राजीव गांधी, नरेंद्र दाभोलकर व मुरलीधर माने यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 

स्मार्ट सिटी नावाने शहरांचा विकास नाहीतर भकास झाल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. केवळ टक्केवारी घेण्यासाठी मोठमोठी टेंडर काढली जातात. कामाचा दर्जा, गुणवत्ता याबरोबरच लोकांच्या जीवाची कुठलीच परवा यांच्याकडून केली जात नाही. मी केंद्रात मंत्री असताना शहर विकासाकरिता पूर्वीच्या युपीए सरकारच्या काळातील ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियान’ ह्या नावात बदल करून स्मार्ट सिटी करण्यात आला परंतु यात शहरातील नागरिकांना किती मनस्ताप सहन करावा लागतो आहे याची रोजच्यारोज कुंभमेळ्याच्या ढिसाळ नियोजनातुन आपल्या दिसतोच आहे.

 

नाशिककरांच्या प्रश्नांवर आता ” हक्कांच शहर ” ह्या माध्यमातून नळ, रस्ते, ड्रेनेज याचबरोबर ह्या मुलभूत सुविधेसोबत शहरी भागातील असंघटित कामगार त्यांचे प्रश्न व सन्मानासोबत सुरक्षेसाठी लढा देईल यासाठीच या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडुन करण्यात आले आहे. हया अभियानाची सुरुवात आज माझ्या उपस्थित झाल्याचे त्यांनी जाहीर केले.

 

महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी नाशिक शहरात खोदून ठेवलेलया रस्त्यामुळे अनेक नागरिकांचे जीव गेले असुन त्यांच्या कुटुंबियांना तुटपुंजी मदत जाहीर करुन त्यांची चेष्टाच करत असल्याचं सांगितलं ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

 

सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष व नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निलेश (बबलु) खैरे यांनी केले. त्यांनी शहरात सुरु असलेल्या कुंभमेळ्याच्या नावाखाली केंद्र सरकारकडून आलेल्या पत्तिस हजार कोटी रुपयांच्या हिस्सेदारीसाठी सत्ताधारी व मनपा प्रशासन यांची आपापसात वादविवाद असुन नाशिककरांच्या जीवांची त्यांना काही देणघेण नसल्याचं त्यांनी प्रास्ताविकात सांगितल.

 

यावेळी व्यासपीठावर नाशिक जिल्हा कॉग्रेस उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, प्रदेश सचिव प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती जाधव, डाॅ. दिनेश बच्छाव, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, रईस शेख, लक्ष्मण धोत्रे, विजय राऊत, उध्दव पवार, किरण जाधव, संतोष ठाकूर, जयेश पोकळे, समाधान बागुल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुसूचित विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी केले तर आभार युवक काँग्रेस नेते स्वप्नील पाटील यांनी केले.

 

कार्यक्रमात वृंदा शेरे, कुसुम चव्हाण, अनिता खरारे, पोपटराव धात्रक, बाबा खतीब, अरुण दोंदे, जाकीर अत्तार, धोंडीराम बोडके, अभिजित राऊत, भारत पाटील, विजय पाटील, अशोक शेडगे, भालचंद्र पाटील, ॲड. सागर वाहुळे, सुदेश मोरे, शंकर जाधव, मंगेश लहांमगे, मोहन शिंदे, संतोष कस्तुरे, राजेंद्र महाले, हर्षल पवार, संदिप वाघ, दिपक राव, कैलास कडलग, इसाक कुरेशी, प्रा प्रकाश खुळे, कैलास महाले, फारुख कुरेशी, जावेद पठाण, राजेंद्र महाले, प्रकाश माळी, संजय पाटील, सईद मनियार, ॲड. सुमित चोपडे, शैलेश मैदं, पोपटराव नागपुरे, मुकेश व्दिवेदी, इरफान बागवान, असिफ पठाण, किसन दुशिंग, आकाश घोलप, भुषण अहिरे, शुभम पाटील, संजय पितळे, सुनिल राजपुत, गोरख साळवे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.